रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 20

  • 3.8k
  • 1.3k

अध्याय 20 हनुमंताचे सीतेला आश्वासन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा अपमान करून व लंका जाळून मारुती परतला कोट्यानुकोटी वीर मर्दून । लंकाभुवना करोनि दहन ।रावणातें अपमानून । कपि परतोन निघाला ॥ १ ॥ त्यावेळी त्याच्या मनात चाललेले विचार : वीर मर्दितां समस्त । सांपडला लंकानाथ ।हनुमान न करी त्याचा घात । श्रीरघुनाथ क्षोभेल ॥ २ ॥रामें वाहिली असे आण । विंधोनियां निजबाण ।रणीं मारीन रावण । असत्य कोण करूं शके ॥ ३ ॥हांती सांपडला लंकानाथ । मारितां क्षोभेल रघुनाथ ।यालागीं न मारीच हनुमंत । जीवें जीत सोडिला ॥ ४ ॥असत्य ठेवोनि स्वामीचे माथां । म्यां मिरवावी वाढिवता ।जळो ते श्लांघ्यता