रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 17

  • 3.2k
  • 1.3k

अध्याय 17 हनुमंताचे रावणसभेत आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताची दैन्यावस्था, ब्रह्मदेवाचे स्मरण रणीं पाठी देवोनि वानरा । लपाला असतां विवरा ।परम लज्जा राजकुमरा । काय महावीरां मुख दावूं ॥ १ ॥माझी वीरवृत्ति अति लाठी । इंद्रजितनामाची ख्याती मोठी ।वानरें नेली पुच्छासाठीं । रणसंकटीं गांजोनी ॥ २ ॥कपिपुच्छाचा दुर्धर मार । रणीं गांजिला राजकुमर ।सैन्या जाला समूळ मार । काय करूं मी आतां ॥ ३ ॥कैसेनि भेटों महावीरां । केंवी मुख दावूं राक्षसेंद्रा ।आतां न वचें लंकापुरा । लाजेचें वीरा अति दुःख ॥ ४ ॥वाहिली सदाशिवाची आण । शिवलों रावणाचे चरण ।प्रमाणें जालीं अप्रमाण । वानरें पूर्ण गांजिलें ॥ ५