रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 15

  • 3.5k
  • 1.3k

अध्याय 15 इंद्रजिताचा मारुतीकडून अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अखयाच्या निधनाने रावण दुःखी अखया कुमार पाडिला रणीं । रावणें ऐकतांचि कानीं ।शंख करित दाही वदनीं । लोळे धरणीं गडबडां ॥ १ ॥मुकुट पडिला सभास्थानीं । हें प्रत्यक्ष देखोन नयनीं ।रावण रडे आक्रंदोनी । विरूद्ध करणी म्यां केली ॥ २ ॥बुद्धिभ्रंश झाला मजसी । कुमार धाडिला युद्धासी ।रणीं वानरें मारिलें त्यासी । बोल कवणासीं ठेवावा ॥ ३ ॥माझें जें कां अशोकवन । तें मज जालें शोकस्थान ।कपीनें लंके घालोनि खान । पुत्रनिधान तेणें नेलें ॥ ४ ॥आम्हां अवघ्यांदेखतां जाण । देहामाजि घालोनि खान ।अखया नेला निजनिधान । नागवण मज आली ॥