रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 14

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 14 रावणपुत्र अखयाचा मारूतीकडून वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऎंशी हजार किंकर, चौदा हजार बनकर व संपूर्णवनाचा मारूतीने विध्वंस केला म्हणून रावणाचा संताप किंकर मारिले ऐशीं सहस्त्र । चवदा सहस्त्र बनकर ।वन विध्वंसिलें मनोहर । तेणें दशशिर कोपला ॥ १ ॥वानर जाणोनि महाबळी । प्रहस्तसुत जंबुमाळी ।रावणें पाचारोनि जवळी । गुज त्याजवळी सांगत ॥ २ ॥मारिले किंकर बनकर । विध्वंसिलें मनोहर ।तो तुवां मारावा वानर । युद्धीं दुर्धर गांजोनी ॥ ३ ॥वानर न मरतां देख । तुज परतल्या एकाएक ।तरी तुवां हारविलें नासिक । नपुंसक राक्षसांत ॥ ४ ॥वानरा न करो मर्दन । तेव्हांचि तुझे काळें वदन ।रासभारोहण अपमान