रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 11

  • 2.9k
  • 1.1k

अध्याय 11 सीता व मारुती यांची प्रथम भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वीच्या घटनांचे स्मरण होऊन सीतेचा अनुताप : सवेग भेटी श्रीरामकांता । परम आल्हाद हनुमंता ।तिच्या निरपेक्ष एकांता । वृक्षाआंतौता बैसला ॥ १ ॥स्वस्थानीं राक्षसी समस्ता । स्वभावें जाहलिया निद्रिस्ता ।अशोकवृक्षातळीं सीता । सावधानता बैसली ॥ २ ॥म्हणे मज नाहीं पापकर्मपरता । आणि कां भोगितें दुःखावस्था ।वृथा लक्ष्मणाभिशापता । तेणें पापें लंकेशा आतुडलें ॥ ३ ॥लक्ष्मणाची मर्यादारेखा । म्यां उल्लंघिता देखा ।अंतरोनी श्रीरामसखा । त्या दशमुखा आतुडलें ॥ ४ ॥छळूं जातां श्रीरामभक्ता । मुकलें मी श्रीरघुनाथा ।हें पाप माझें माथां । दुःखावस्था मी भोगीं ॥ ५ ॥अवज्ञा केली म्यां