रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 7

  • 3k
  • 1.2k

अध्याय 7 रावणाचे अशोकवनात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीचे अशोकवनात आगमन : पूर्वप्रसंगाप्रती । दूतिकांमागें मारूती ।आला अशोकवनाप्रती । सीता सती वंदावया ॥ १ ॥देखोनियां अशोकवन । हनुमान घाली लोटांगण ।करोनियां श्रीरामस्मरण । सीतादर्शन करूं निघे ॥ २ ॥ अशोकवनाचे वर्णन : साधावया सीता चिद्रत्‍न । हनुमान क्षण एक धरी ध्यान ।देखोनियां अशोकवन । आलें स्फुरण हनुमंता ॥ ३ ॥जैसा श्रीरामाचा बाण । तैसें करोनि उड्डाण ।अशोकवनामाजी जाण । आला आपण हनुमंत ॥ ४ ॥वृक्ष सफळ आणि सरळ । वन देखोनि विशाळ ।करी हर्षाचा गोंधळ । घोंटी लाळ मिटक्या देत ॥ ५ ॥दाट देखोनियां झाडां । उल्लास आला माकडा