रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 18

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 18 हनुमंताचा लंकाप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताच्या उड्डाणात सिंहिकेचे विघ्न : सुरसा देवविघ्नातें । स्वयें जिणानि हनुमंते ।पुढें लंघोनि समुद्रातें । सिंहिका तेथें ग्रासूं आली ॥१॥ प्लवमानं तु तं द्दष्ट्वा सिंहिका नाम राक्षसी ।मनसा चिंतयामास प्रकृद्धा कामरुपिणी ॥१॥इदं हि सुमहत्सत्वं चिरस्य वशमागतम् ।इति संचित्य मनसा छायामस्य समक्षिपत् ॥२॥ गगनीं उडतां हनुमंत । छाया पडती समुद्रांत ।सिंहिकेचा मनोरथ । ग्रासावया हनुमंत वाढली ॥२॥शिववरद सिंहिकेसी । छाया धरितां प्राणी ग्रासी ।छायाग्रह नांव तिसी । ते हनुमंतासीं गिळों आली ॥३॥कपिच्छाया पडतां जळीं । सिंहिका ते छाया गिळी ।हनुमंताची गति खुंटली । देहाची वळली मुरकुंडी ॥४॥ छायायां संगृहीतायां चिंतयामास वानरः ।किमाक्षिप्तोऽस्मि सहसा