रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 17

  • 3.4k
  • 1.2k

अध्याय 17 हनुमंताचे समुद्रावरुन उड्डाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।संगताः प्रीतिसंयुक्ता विनेदुः सिंहविक्रमाः ॥१॥ संपातीकडून सीतेची माहिती मिळाल्यामुळे वानरांना आनंद : संपातीनें सीताशुद्धी । यथार्थ सांगितली बुद्धी ।तेणें वानरांची मांदी । जयजयशब्दीं गर्जत ॥१॥मिळोनि वानरांचा भार । सिंहनादाहूनि थोर ।करिते जाले भुभुःकार । सीता सुंदर सांपडली ॥२॥येरयेरां आलिंगण । येरयेरां अभिनंदन ।सीता सांपडली चिद्रत्‍न । हर्षे उड्डाण करिताती ॥३॥आमच्या कष्टांची जाली सिद्धी । आजि पावली सीताशुद्धी ।म्हणोनि वानरांची मांदी । हर्षानुवादीं डुल्लत ॥४॥येरयेरां दाविती वांकुल्या । येरयेरा करिती गुदगुल्या ।सत्य सीताशुद्धी जालिया । आमची फिटली आशंका ॥१०५॥अंगदे बैसोनि सपरिवार । शतयोजन हा सागर ।उल्लंघो शके कोण