रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 16

  • 3.8k
  • 1.3k

अध्याय 16 संपातीचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ फळांनी व पाण्याने वानरांची तृप्ती : वानरां मास उपोषण । तापसीं फळें आणूनि पूर्ण ।दिधलें यावृत्तृप्ति भोजन । वानरगण उल्लासी ॥१॥ संतृप्तास्ते फलैर्मूलैः संजाताः शीतवारिणा ।बलवीर्याश्च ते सर्वे तत्रासन्हरिपूगवाः ॥१॥अपतन्सर्व एवैते दिशो वानरयूथपाः ॥२॥ भक्षितां पैं फळमूळ । सेविता निर्मळ जळ ।वानर सुखी जाले सकळ । हर्ष प्रबळ तृप्तीचा ॥२॥वानरांचे सकळ दळ । पूर्विल्यापरिस अति प्रबळ ।शतगुणें वाढलें बळ । जनकबाळ शोधावया ॥३॥ यानंतर सर्व वानरांची परत जाण्याची इच्छा : वानर म्हणती हनुमंतासी । येथें काय फळें खावया आलासी ।किंवा सीता शोधावयासी । त्या रामकार्यासी साधावें ॥४॥शोधितां या विवराआंत  । सीता न