रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 15

  • 3.4k
  • 1.2k

अध्याय 15 तापसी-हनुमंत-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सावध झाल्यावर त्या वानरांना सभोवती सुवर्णभुवन दिसते : वानर होवोनि सावधान । पाहती तंव हेमभुवन ।हेमशय्या हेमासन । उपरी आस्तरण हेमाचें ॥१॥हेममय तेथींची क्षिती । हेममय अवघ्या भिंती ।हेमदीपिका हेमदीप्ती । पात्रपंक्ती हेममय ॥२॥हेमविमानें हेमांबरें । हेमबद्ध सरोवरें ।हेममत्स्य हेमनगरें । जळचरें हेममय ॥३॥मुक्ताफळें हेमरत्‍नें । हेमपदकें हेमभूषणें ।हेममय उपकरणें । हेमाभरणें पशुपक्षी ॥४॥ ते विवर सर्व समृद्धीने निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण : विवरीं धनधान्यसमृद्धी । विवरीं परमामृतनदी ।विवरामांजि ऋद्धिसिद्धी । सुख त्रिशुद्धी वानरां ॥५॥नसोनि रविचंद्रभास । विवरामाजी नित्य प्रकाश ।तेणें वानरां अति उल्लास । पाहती वास वायपुत्राची ॥६॥ऐसिये रमणीय स्थानीं हनुमंत पाहोनियां नयनीं