अध्याय 14 वानरांचा गुहाप्रवेश ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ एक महिना होतांच पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील वानर परत आले : पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य । उत्तर नैर्ऋत्य आग्नेयकोण ।पाताळदिशा स्वर्गभुवन । आले शोधून वानर ॥१॥ तदहः प्रथमं कृत्वा मासे प्रस्रवणं गतां ।कपिराजेन संगम्य निराशाः कपिकुंजराः ॥१॥समेत्य मासे संपूर्णे सुग्रीवमुपचक्रमुः ।तं प्रस्रवणपृष्ठस्थमभिगम्याभिवाद्य च ।सुग्रीवं प्लवगाः सर्वे सुषेणप्रमुखा ब्रुवन् ॥२॥ राया सुग्रीवांचे आज्ञापन । मासें एकें संपूर्ण ।अवघीं यावें सीता शोधून । न येतां दारूण राजदंड ॥२॥ सर्वजण शोध न लागता परत आले : प्रस्रवण गिरिवर । तेथें वसे श्रीरामचंद्र ।तयापासीं सुग्रीव वीर । नित्य तत्पर सेवेंसीं ॥३॥श्रीराम पुसे सुग्रीवासी । वानर गेले