रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 7

  • 3.2k
  • 1.2k

अध्याय 7 सुग्रीवराज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या निधनाने वानरांचा घबराट : श्रीरामाच्या दृढबाणीं । घायें वाळी पडिला रणीं ।लोळतां देखोनि धरणीं । वानरां पळणी मांडली ॥१॥ निहते वालिनि रणे रामेण परमात्मना ।जग्मुस्ते वानराः सर्वे किष्किंधां भयविंह्वलाः ॥१॥तारामूचुर्महाभागे हतो वाली रणाजिरे ।अंगदं परिगृह्यार्थ मंत्रिणं परिनोदय ॥२॥चतुर्द्वारकपाटादीन्बद्धा रक्षामहे पुरीम् ।वानराणां तु राजानमंगदं कुरु भामिनि ॥३॥ श्रीरामाच्या बाणनेटीं । वाळी पडिला देखोनि दृष्टीं ।वानरसेना भयसंकटीं । उठाउठीं पळाली ॥२॥वाळी मारिला विंधोनि पूर्ण । सैन्यावरी सोडील बाण ।अवघियांचा घेईल प्राण । पलायमान तेणें धाकें ॥३॥श्रीरामबाण अति दुर्धर । घायें निवटिले त्रिशिरा खर ।चवदा सहस्र निशाचर । बाणीं सत्वर निर्दळिलें ॥४॥श्रीराम जीवें उरों नेदी