अध्याय 6 वालीचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम हनुमंत सौमित्र । सुग्रीवसमवेत वानर ।पावोनि किष्किंधेचें द्वार । केला भुभुःकार सुग्रीवें ॥१॥ अथ तस्य निनादं तं सुग्रीवस्य महात्मनः ।शुश्रावांतःपुरगतो वाली भ्रातुरमर्षणः ॥१॥ सुग्रीवाचेनि गिरागजरें । नादें दुमदुमिलें अंबर ।कोसळों पाहे गिरिकंदर । वाळीचें मंदिर दणाणलें ॥२॥ सुग्रीवाची गर्जना ऐकून वालीचा संताप : ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । कोपें खवळलासे वीर वाळी ।आरक्त जाला क्रोधानळीं । जेंवी कुलाचळीं बालसूर्य ॥३॥वाळी विचारी हृदयांत । आतांच युद्धीं जर्जरीभूत ।म्यां पाडिला होता मूर्च्छित । सवेंचि गर्जत केंवी आला ॥४॥माझ्या घायें मासानुमास । कुंथत पडे वर्षानुवर्ष ।सवेंचि आला युद्धास । अति उल्लासें गर्जत ॥५॥आतां असो हा