अध्याय 4 वाली सुग्रीवाच्या वैराची मूळ कथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दोघा बंधूंच्या कलहाच्या कारणासंबंधी श्रीरामांचा प्रश्न : निर्दळोनियां वाळीसी । सदार राज्य सुग्रीवासी ।द्यावया श्रीराम उल्लासी । मित्रकार्यासी अवंचक ॥१॥स्वकार्य सांडोनियां मागें । मित्र-मित्रकार्यार्थ लगवेगें ।श्रीरघुनाथ धांवे अंगें । साह्य सर्वेस्वें शरणागता ॥२॥श्रीराम विचार करी शुद्धु । हे तंव दोघे सखे बंधु ।कां पडला द्वेषसंबंधु । द्वेषसंबंधु पुसत ॥३॥ किंनिमित्तं महद्वैरं श्रोतुमिच्छामि तत्वतः ।अनंतरं वधिष्यामि संप्रधार्य बलाबलम् ॥१॥ तुम्ही दोघे बंधु सहोदर । तुम्हां दोघांत कां पडिलें वैर ।तेंही अतिशयेंसी दुर्धर । येरयेरां घातक ॥४॥ सुग्रीवाकडून निवेदन : या वैराचें मूळ कारण । समूळ सांगावें संपूर्ण ।ऐकोनिया श्रीरामभाषण ।