रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 17

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 17 जटायु-रावण युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रथात बसवून रावणाचे प्रयाण : रावण करोनि सीताहरण । सवेग निघाला आपण ।ते काळींचें गमनलक्षण । सावधान अवधारा ॥ १ ॥ वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १ ॥ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।अंकेनादाय वैदेहीं रथमारोहयत्तदा ॥ २ ॥ सीता बैसवितां रथासीं । आंग टाकिलें भूमीसीं ।रावणें धरोनियां केशीं । वाहोनि अंकासी बैसे रथीं ॥ २ ॥अंकीं बैसवितां पद्माश्री । तेणें रावण जाला सुखी ।सीता जाली परम दुःखी । धांवा पोखी आक्रंदें ॥ ३ ॥ सीतेचा विलाप, आक्रंदन व लक्ष्मणाबद्दल अनुताप : धांव पाव गां श्रीरघुवीरा । सवेग