रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 10

  • 3.4k
  • 1.3k

अध्याय 10 दूषण राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्धार्थी चालिला खर । देखोनि उभा श्रीरघुवीर ।अवघे खवळले निशाचर । शस्त्रसंभार सुटले ॥ १ ॥ ततस्ते कूरकर्माणं क्रुद्धाः सर्वे निशाचराः ।रामं नानाविधैःशस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ १ ॥ श्रीरामांचे युद्धकौशल्य : श्रीराम रणरंगधीर । क्रूरकर्मी निशाचर ।मोळोनि समग्र सैन्यसंभार । शस्त्रें अपार वर्षले ॥ २ ॥गदा मुग्दल तोमर त्रिशूळ । परशु पट्टिश महाशूळ ।कातिया कुर्‍हाडी परिघ मुसळ । लहुडी स्थूळ महाघात ॥ ३ ॥खड्ग हाणिती खणखणां । बाण सुटती सणसणां ।वोडणें वाजती दणदणां । लागली निशाणां एक घाई ॥ ४ ॥श्रीराम एकाकी एकला । गेला तुटला निवटला ।शस्त्रसंपाती आटला । म्हणती निमाला