रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 5

  • 2.9k
  • 1.1k

अध्याय 5 अगस्ती ऋषींकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ताबडतोब आजच जाण्याचा पदेश : श्रीराम म्हणे महामती । तुझ्या जेष्ठ बंधु अगस्ती ।तयाचिया दर्शनार्थी । तुम्हांप्रती मी आलों ॥ १ ॥करावया ज्येष्ठाचें दर्शन । अति उदति माझें मन ।कोणें मार्गें करावें गमन । कृपा करोनि सांगावें ॥ २ ॥ यदि बुद्धिः कृता राम द्रष्टुं तं मुनिपुंगवम् ।अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते॥ १ ॥ जरी अगस्तीचें दर्शन । करावया वांछी तुझें मन ।तरी आजचि करावें गमन । विलंबव्यवधान न करावें ॥ ३ ॥ आश्रमातील देवस्थाने : जे मार्गी करितां गमन । सर्वथा न चुकिजे आपण ।तैसें सांगेन मार्गचिन्ह । सावधान