रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 3

  • 4k
  • 1.5k

अध्याय 3 शरभंगऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हत्वा त तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।आश्रमं शरभंगस्य राघवौ तौ प्रजग्मतुः ॥ १ ॥तस्य् देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।समीपे शरभंगस्य ददर्श महदद्भुतम् ॥ २ ॥ श्रीरामाचे शरभंगाश्रमात आगमन : महाभयानक विराधु । त्याचा क्षणार्धे केला वधु ।प्रतापें शोभती दोघें बंधु । परम आल्हादु सीतेसी ॥ १ ॥मग तिघें जणें वेगेंसीं । निघालीं शरभंगाआश्रमासी ।मार्ग क्रमितां दो कोशीं । त्या आश्रमासी देखिलें ॥ २ ॥तैं शरभंग तपोराशी । तो न्यावया ब्रह्मलोकासी ।ब्रह्मयाने धाडिलें इंद्रासी । विमानेंसीं हंसयुक्त ॥ ३ ॥ ब्रह्मदेवाचे विमान धाडले : हंसयुक्त विमानंसी । बैसावया सामर्थ्य नाहीं इंद्रासी ।पुढें घालोनि