रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 1

  • 4.3k
  • 1.5k

अरण्यकाण्ड अध्याय 1 श्रीरामांचे दंडकारण्यात गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकं अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥कुजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् ॥ २ ॥ श्रीरामनाम महिमा : श्रीराम चूतवृक्ष प्रबळ । त्यावरी वाल्मीक कवि कोकिळ ।नारदवसंतें फुटली कीळ । मधुराक्षरी सरळ आलापु केला ॥ १ ॥त्या मधुराक्षरांमाजी मधुर । श्रीरामनाम हें सुखसार ।सुखी केले चराचर । सुखें शंकर डुल्लत ॥ २ ॥उफराटें राम ये अक्षरी । मरा मरा या उत्तरीं ।नारद वाल्मीका उपदेश करी । दों अक्षरीं उद्धरला ॥ ३ ॥नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध । जो जपे तो पावन शुद्ध ।श्रीरामनाम जगद्वंद्य ।