रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 18

  • 3.1k
  • 1.3k

अध्याय 18   श्रीरामपादुकांसह भरत अयोध्येत येतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरत श्रीरामांची क्षमायाचना करतोः भरतें धांवोनि आपण । दृढ धरिले श्रीरामचरण ।अश्रु चालिले संपूर्ण । तेणें चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥ स्वस्थगात्रस्तु भरतो वाचा संसज्जमानया ।कृताजलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत ॥१॥ स्वेद रोमांच रवरवित । तेणें सर्वांग डवडवीत ।हरिखे उत्कंठित जालें चित्त । सद्रदित पैं वाचा ॥२॥विकळ वाचा होवोनि ठायीं । विनटोनि श्रीरामाच्या पायीं ।अंजळिपुट जोडोनि पाहीं । भरत लवलाहीं विनवित ॥३॥करोनिया कुशास्तरण । तुजवरी देत होतों प्राण ।हा माझा अपराध दारूण । क्षमा संपूर्ण करीं स्वामी ॥४॥भूतीं पृथ्वी नांगरून । दाढी घालोनि करिती दहन ।जीवनेंसहित लाताऊन ॥ कर्दमकंदन जन करिती ॥५॥तो