रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 16

  • 3.3k
  • 1.3k

अध्याय 16 श्रीरामांकडून पिंडदानविधी ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आघ्राय रामस्तं मूर्घ्नि परिष्वज्य च राघवं ।अंके भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरं ॥१॥क नु तेऽभूत्पिता तात यदरण्यं त्वमागतः ।नहि त्वं जीवतस्तस्य वनमागतुमर्हासि ॥२॥किंनु वीर महारण्ये तवागमनकारणं ।कच्चिदॄशरथो राजा कुशली सत्यसंगरः ॥३॥तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती ।सुखिनी किच्चदार्या च देवी नंदती कैकेयी ॥४॥ श्रीराम भरतास अयोध्येचे कुशल विचारतातः अति प्रीतीं रघुनंदन । भरत आणि शत्रुघ्न ।हृदयी धरिले आलिंगोन । सुखसंपन्न तेणें दोनी ॥१॥हृदया हृदय एक जालें । तेणें सुखाचें भरतें आलें ।दुख निःशेष निमालें । सागर भरिले स्वानंदें ॥२॥परमानंदें तृप्ति गाढी । द्वंद्वदुःखें देशोधडी ।होत हरिखाचिया कोडी । जोडिला जोडी श्रीराम ॥३॥मग भरतासी रघुनंदन