रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 15

  • 4.4k
  • 1.4k

अध्याय 15 श्रीराम-भरतभेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताचे चित्रकूटाकडे प्रयाण : देखोनि चित्रकूट पर्वत । अत्यंत हरखिला भरत ।देखावया श्रीरघुनाथ । उल्हास अद्‌भुत सर्वांसी ॥१॥सेन शृंगारिली मनोहर । वीरीं केले नाना शृंगार ।गर्जत घेवोनि गजभार । भरत सत्वर चालिला ॥२॥कोईते कातिया कुर्हा्डे । वन छेदिती सैन्यापुढें ।वेगीं भूमि सज्जिती मातियेडे । गज रथ घोडे चालावया ॥३॥अश्वगजांचा कडकडाट । रथ चालिले घडघडाट ।सैन्य चालतां न पुरे वाट । रजें वैकुंठ व्यापिलें ॥४॥चरणरज अति उभ्दट । लोकलोकांतर त्यजोनि स्पष्ट ।ठाकोनि जावें वैकुंठ । हा नेटपाट रजाचा ॥५॥गज गर्जती गहिरे । वारूं हिंसती एकसरें ।तुरें वाजती अपारें । गिरा गंभीर वीर गर्जती ॥६॥निशाण