रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 8

  • 3.8k
  • 1.4k

अध्याय 8 श्रीरामांचे वनाकडे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामस्त्वनेन नाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।व्रजापृच्छस्व सौमित्र सर्वमेव सुहृज्जनम् ॥१॥ये च राज्ञे ददौ महात्मा वरुणः स्वयम् ।जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥२॥अभेद्ये कवचे दिव्ये तूणी चाक्षय्यसायकौ ।सर्वमायुधमादाय क्षिप्रमाव्रज लक्ष्मण ॥३॥स सुहृज्जनमामंत्र्य वनवासाय निश्चितः ।इक्ष्वाकुगुरुमागस्य जग्राहायुधमुत्तमम् ॥४॥तद्दिव्यं राजशार्दूलः संस्कृतं माल्यभूषितम् ।रामास्य दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम् ॥५॥ श्रीराम लक्ष्मणाला मातेचा आशीर्वाद घेऊन आयुधे आणण्यास पाठवितात : श्रीराम म्हणे सौमित्रासी । जरी तूं वनवासासी येसी ।तरी पुसोनि ये निजमातेसी । आणि पत्‍नीसी भेटोनि ॥१॥आणिकही सुहृदसंबंधे । त्यांसी पुसोनि यावें यथवबोधें ।माझीं आणावीं दिव्यायुधें । तीं अति शुद्धें युद्धार्थी ॥२॥मज दिधलें दशरथें । वरुणदत्त धनुष्यातें ।तेणेसीं आणावे