रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 1

  • 6.2k
  • 4.3k

अयोध्याकाण्ड अध्याय 1 श्रीरामलक्ष्मणांच्या शस्त्रास्त्र विद्यानैपुण्याचे प्रदर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गजाननाय महते प्रत्युहतिमिरच्छिदे ।अपारकरुणामूर्त्यै सर्वज्ञाशे नमः ॥ १ ॥चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ रामायणाचे रूपक : श्रीरामकथेची नव्हाळी । शेष वंदी पाताळी ।शिव वंदी प्रेमसमेळी । कथाभूतळी जगद्वंद्य ॥१॥तरी ते शतकोटी रामायण । आळवूं शकेल कोण ।तेथे मी अपुरते दीन । परी तो जनार्दन स्वयें वदवी ॥२॥तरी श्रीरामस्वरूप चिद्रूपता । चैतन्यशोभांकित सीता ।तरी देवक्तांच्या क्रूतकार्यार्था । मानुष्यजाड्यता अवतारू ॥३॥अर्धनारीनटेश्वरी । जो पुरूष तोचि नारी ।तेंवी ते सीता निर्धारी। एकात्मतेवरी स्त्रीपुरुष ॥४॥जैसीं बहुरूपी रावराणी । परी स्त्रीपुरुषभाव नाहीं मनी।तरी तेचि संपादणी। लोकसंरक्षणी सत्यत्वे दावी॥५॥’एकाकी न रमते’