स्मार्ट पुणेकर

(18)
  • 15.6k
  • 6.2k

स्मार्ट पुणेकर... काही वर्षांपूर्वी बातमी होती की पुणे शहर आता स्मार्ट होणार! स्मार्ट सिटी प्रशासनाने करायचे ठरवले पण मग त्यांच्या लक्षात आले की काय माहीत, त्यांनी माणसांच्या ऐवजी रस्ते आणि फूटपाथ सजवून स्मार्ट करायला घेतले! यातून पुणे स्मार्ट झाले की नाही कळले नाही,पण पुण्यात रहाणारी माणसे मात्र जन्मजात स्मार्ट आणि डोकेबाज असतात यात तिळमात्र शंका नाही.पुण्यातली माणसे आधीच स्मार्ट आहेत हे सिध्द करणारा हा एक किस्सा.... त्यावेळी मी टेलिफोन खात्यात नुकताच नोकरीला लागलो होतो... त्या काळात आपल्याकडे फक्त landline सेवा उपलब्ध होती. टेलिफोन केंद्राच्या क्षमता कमी असायच्या आणि टेलिफोनसाठी भरपूर वेटींग लिस्टही असायची... एखाद्याला नवीन टेलिफोन कनेक्शन द्यायचे झाले तर