अध्याय 27 श्रीरामजानकी अयोध्याप्रवेश ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांनी विष्णुचाप वरुणास दिले : परशुराम गेला स्वस्थाना । स्वस्थता दशरथाचे मना ।आनंद वाढला चौगुना । रघुनाथ जाणा निजविजयी ॥ १ ॥सांडोनि वैष्णवचापासी । भार्गव गेला स्वाश्रमासी ।धनुष्य दिधलें श्रीरामासी । तेणें वरुणासी तेंदिधलें ॥ २ ॥मी आपुलिया निजात्मशक्तीं । रणीं जिंकोनि राक्षसपंक्ती ।वैष्णवचाप हें असतां हातीं । लोक म्हणती धनुष्यबळ ॥ ३ ॥माझ्या यशाची निजपुष्टीं । अवघी जाईल धनुष्यासाठीं ।यालागीं तें उठाउठीं । राम जगजेठी स्वयें त्यागी ॥ ४ ॥स्वसामर्थ्य नाहीं ज्यासी । धनुष्य यश केंवी होईल त्यासी ।यालागीं श्रीराम नव्हें अभिलाषी । म्हणोनि वरुणासी दिधलें ॥ ५ ॥ अयोध्येत प्रवेश,