रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 22

  • 4k
  • 1.7k

अध्याय 22 सूर्यवंशवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दशरथ राजा मिथिलेला येतो : जीवशिवांचे समाधान । ते हे कथा रामायण ।पवित्र परिकर पावन । जगदुद्धरन जडजीवां ॥ १ ॥श्रीरामीं संलग्नता । सर्वांगें समरसें सीता ।यादि नांव सुलग्नता । ते लग्नकथा अवधारा ॥ २ ॥मार्गीं वसोनि चारी वस्ती । राजा दशरथ शीघ्रगतीं ।आला विदेहपुराप्रतीं । जेथें रघुपति निजविजयी ॥ ३ ॥विदेहपुरा वस्ती आले । ते त्रिभुवनीं विजयी जाले ।विश्वामित्रें मित्रत्व केलें । गुरुत्व दिधलें वसिष्ठें ॥ ४ ॥श्रीवसिष्ठें विश्वामित्रु । केला श्रीरामीं धनुर्विद्यागुरु ।आपण ब्रह्मविद्यासद्‌गुरु । विजयी रामचम्द्र याचेनि ॥ ५ ॥वसिष्ठनिष्ठानिजनिर्धारीं । दशरथ पावला विदेहपुरी ।रत्न्कळसांचिया हारी । तेजें अंबरीं रवि