रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 20

  • 3.7k
  • 1.5k

अध्याय 20 श्रीराम-सीता विवाह ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : श्रीरामाचे पूर्णपण । रूपरेखागुणलावण्य ।देखोनि सीतेचें वेधलें मन । सर्वथा आन नावडे ॥ १ ॥सांडोनियां चम्द्रामृत । चकोर अन्य न सेवित ।तेंवी सांडूनि रघुनाथ । सीतेचें चित्त आन न मानी ॥ २ ॥जनकें देखोनियां रघुनाथ । चित्तीं आल्हाद अत्यंत ।जानकी द्यावी निश्चितार्थ । साशंकित धनुष्यार्थीं ॥ ३ ॥ श्रीरामांना पाहून सभाजनांची अनेकविध अवस्था : सभास्थियांचे नयन । रामरूपीं अति निमग्न ।रावनासी पडलें मोहन । तटस्थ जन श्रीरामें ॥ ४ ॥श्रीराम देखोनि ऋषिपंक्तीं । अवघे आश्चर्य मानिती ।सीता द्यावी रघुपतिप्रती । मानलें चित्तीं सर्वांसी ॥ ५ ॥पुढील कार्य अति