रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 18

  • 3.9k
  • 1.5k

अध्याय 18 शिवधनुष्याचा प्रताप व सीतास्वयंवरात रावणाची फजिती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वयंवरास आलेले निमंत्रित राजे-महाराजे : स्वयंवरसभेची स्थिती । स्वर्गीं देव विमानीं पाहती ।शहाण्णव कुळींचे भूपती । दाटलें क्षितीं सन्मानें ॥ १ ॥आले तपस्वी ऋषीवर । आले यक्ष गंधर्व किन्नर ।स्वयंवरा आले निशाचर । दैत्य महावीर तेही आले ॥ २ ॥धैर्य वीर्य महाशौर्य । रूपगुणी गुणगांभीर्य ।धर्माधर्म अति औदार्य । ऐसे नृपवर्य येते झाले ॥ ३ ॥जे गोब्राह्मणां साह्यार्थीं । ज्यांची यशकीर्ती महाख्याती ।ज्यांचे पवाडे स्वर्गीं गाती । स्वयंवरार्थीं येते जाले ॥ ४ ॥जे दान देती सर्वस्व । ज्यांची वैकुंठीं वर्णिती वाढिव ।ज्यांचें त्रैलोक्यीं प्रसिद्ध गौरव । तेही राजे