अध्याय 17 सहस्रार्जुनाचा वध व शिवधनुष्याची पूर्वकथा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ राजा व राजपुत्र यांच्याशी युद्ध व त्यांचा निःपात – परशुराम पाहे दुरून । निर्नायकी दिसे सैन्य ।राजा नाहीं आला आपण । राजपुत्र पूर्ण देखिले ॥ १ ॥रायाचे राजसुत । शोधोनि मारावे समस्त ।हे मातेची आज्ञा समर्थ । तो मी कार्यार्थ साधीन ॥ २ ॥केला त्र्यंबकाचा टणत्कार । नादें मूर्छित झाले सुर ।दुमदुमले गिरिकंदर । राजकुमार धाकिन्नले ॥ ३ ॥धाकें दचकला प्रधान । उभा ठेला धैर्य धरून ।सैन्यें उभ्या उभ्या सांडीती प्राण । टणत्कारें पूर्ण नभ कोंदलें ॥ ४ ॥बाण सोडिला सिंहमुख । तेणें गज मारिलें निःशेष ।रथांचे छेदोनि आंख