रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 12

  • 3.4k
  • 1.6k

अध्याय 12 ताटिका वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हे रामायणी निजकथा । जैं आदरें ऐके श्रोता ।तैं पापपुण्यांच्या करी घाता । स्वभावता नित्यमुक्त ॥१॥कथाश्रवणें नित्यमुक्त । हाही नवलाव नव्हे येथ ।अक्षरीं अक्षर अक्षरार्थ। श्रीरघुनाथकथार्थें ॥२॥पढतां रघुनाथचरित्र । श्रोते वक्ते नित्य पवित्र ।धन्य ऎकती त्यांचे श्रोत्र । धन्य वक्त्र वदत्याचें ॥३॥धन्य धन्य वाल्मीकि मुनी । श्रीरामकथा वदली वाणी ।कथा त्रैलोक्यपवनी । भवमोचनी चरितार्थ ॥४॥रामनाम दों अक्षरीं । कुंटिणी वंदिजे सुरवरीं ।ऐशी कथेची अगाध थोरी । ते कोणें वॆखरीं वानावी ॥५॥हें असो पूर्वकथासंबंधीं। श्रीरामासी लागे समाधी ।ते स्वयें वसिष्ठ उद्बोधी । ते कथाविधी अवधारा ॥६॥श्रीराम जाला सावधान । प्रपंचपरमार्थस्थितीं समान ।हे वसिष्ठांचे