रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 10

  • 4.1k
  • 1.7k

अध्याय 10 राजा जनक व शुकाचार्य यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –न राघव तवास्त्यन्यज्ञेयवतां वर ॥स्वयैव सूक्ष्मया बुद्ध्या सर्वं विज्ञातवानसि ॥१॥ विश्वामित्र म्हणे रघुनाथा । तूं सूक्ष्मबुद्धि अति तीक्ष्णता ।ज्ञान ज्ञेय परमार्था स्वभावता परिपूर्ण ॥१॥ज्ञात्यांमाजी ज्ञानवरिष्ठ । त्यांचा अनुभव जो चोखट ।तो तुजमाजी दिसे प्रकट । वैराग्य उद्‌भट ज्ञानगर्भा ॥२॥वैराग्य जें ज्ञानसगर्भ । तोचि ज्ञानाचा समारंभ ।वैराग्येंवीण ज्ञान दुर्लभ । तें तुज सुलभ स्वभावता ॥३॥ भगवद्‌व्यासपुत्रस्य शुकस्येव मतिस्तव ।विश्रांतिमात्रमेवैतज्ज्ञाता ज्ञेयमपेक्षते ॥२॥ जैसा शुक व्याससुत । जन्मापासोनि स्वभावमुक्त ।तैसाचि तूं रघुनाथ । प्राप्त परमार्थ स्वन्हावें ॥४॥त्या शुकाचा ज्ञानार्थ । विकल्पें पावला घात ।तोचि गुरुवाक्यें निश्चित । निजपरमार्थ पावला