रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 9

  • 4.4k
  • 2.1k

अध्याय 9 श्रीरामांचे वैराग्यनिरुपण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सन्मुख देखोनि श्रीराम । विश्वामित्राचा मनोधर्म ।सुखावोनि सप्रेम । आनंदे परम बोलत ॥१॥आजी माझें सार्थक कर्म । आजी माझा सफळ धर्म ।आजी माझें पूर्ण काम । रायें श्रीराम यज्ञार्थ दिधला ॥२॥ऋषि म्हणे श्रीरामासी । चाल जाऊं माझ्या आश्रमासी ।सिद्धि पाववीं स्वधर्मासी । तूं सर्व कामासी निजमोक्ष ॥३॥राम म्हणे ऋषि समर्था । कांही पुसेन मनोगता ।कृपा करावी कृपावंता । मी तत्वता वचनार्थी ॥४॥ देहदोषांविषयी श्रीरामांचा विश्वामित्रांस प्रश्न : देह तंव अत्यंत अशक्त । देहकर्म तेंही नाशवंत ।कर्मफळ ते क्षयभूत । सुख कोण येथ देहसंगे ॥५॥देहलोभे आर्तभूत । जो विषय सेवीत ।तो तत्काळ विष्ठा