अध्याय 6 श्रीरामजन्मप्रसंग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचा जन्मकाळ : श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं ।विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य ।लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण ।केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥शुद्धसुमनीं वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥ ५ ॥ सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन : श्रीराम