रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 5

  • 4.4k
  • 2k

अध्याय 5 ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥ २ ॥राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥येरी म्हणे मी नव्हे