होल्ड अप - प्रकरण 27

  • 5.3k
  • 2.8k

होल्ड अप प्रकरण २७ कोर्टाच्या मागच्या बाजूला एकदम गलका झाला. पाणिनी ने मागे वळून पाहिले तर गौतम पिसे ला घेऊन कनक येताना दिसला.त्या मागोमाग लेडीज कॉन्स्टेबल ज्योतिर्मयी सुखात्मे ला घेऊन येतांना पाणिनी ला दिसली. “ युअर ऑनर बचाव पक्षातर्फे मी आणखी दोनच साक्षीदार कोर्टासमोर आणू इच्छितो, सिया माथूर इथे येई पर्यंत. या दोघांनाही बचाव पक्षातर्फे समन्स दिले गेले आहे आणि ते अत्ता कोर्टात हजर आहेत. ” पाणिनी म्हणाला “ ठीक आहे.कोण आहेत ते दोन साक्षीदार? ” न्यायाधीशांनी विचारलं. “ त्यापैकी पहिला आहे गौतम पिसे.” न्यायाधीशांनी बेलीफ ला सांगून गोतम ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं रहायला सांगितलं. “ गौतम, आपली प्रथम भेट