होल्ड अप - प्रकरण 24

  • 5.5k
  • 2.9k

“ मला कशाने धक्का बसेल आणि कशाचा फायदा होईल हे तुम्ही मला सुचवायची गरज नाही,तुम्ही स्वतःच्या पायाखालची वाळू घसरत नाहीये ना तेवढच बघा.” पाणिनी म्हणाला. आणि बाहेर पडला........ (प्रकरण २३ समाप्त.) पुढे चालू.... होल्ड अप प्रकरण २४ “ सरकार विरुध्द इनामदार हा खटला पुढे चालू करा.” एरंडे म्हणाले. “ सकृत दर्शनी असं दिसतंय युअर ऑनर की मला हवा असलेला साक्षीदार आज दुपारी तीन वाजे पर्यंत इथे हजर राहू शकेल.पण मी आधी म्हणालो त्या नुसार मला आरोपीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणायचंय पण टे अगदी शेवटचा साक्षीदार म्हणून आणि त्यानंतर मेहेरबान कोर्टावर मी निर्णय सोपवणार आहे.पण त्या आधी मला सिया माथूर ची तपासणी