चुकलेल्या वाटा . "जोशीसाहेब म्हणजे एकदम तत्वाचा माणूस...""इथले सगळे सुपरवायझर चांगले आहेत, पण हा जोशी म्हणजे ना एकदम खडूस!" नोकरीला नवीनच लागलो होतो आणि पहिल्याच दिवशी तेथील सुपरवायझरबद्द्ल जुन्याजाणत्या कर्मचाऱ्यांच्याकडून अनाहूतपणे माहीती दिली जात होती. कुणाबरोबर कसे वागायला हवे,कसे आणि किती बोलायला हवे याच्या नकळत टीप्स मिळत होत्या. माझ्या लक्षात आले की बाकी सगळ ठीक आहे,पण सर्वसाधारणपणे या जोशींबद्दलचा मात्र विचित्र रिमार्क पास होताहेत आणि जोशी एकदम खडूस आहे असेच सगळेजण बोलत होते.ते कडक शिस्तीचे असल्याने त्यांच्यापासून कायमच सावध रहावे असा सल्लाही मिळत होता. ते सगळ ऐकल्यावर नाही म्हटल तरी या माणसाबद्दल थोडी आदरयुक्त भीतीही वाटायला लागली होती... दुसऱ्याच दिवशी