देवयानी विकास आणि किल्ली - भाग १

  • 12k
  • 8.3k

   देवयानी विकास आणि किल्ली. पात्र परिचय   विकास                          नायक देवयानी                         नायिका   शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर      भाग 1   विकास एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट मॅनेजर होता. त्याला आज मार्केट व्हिजिट ला जायचं होतं म्हणून लवकर आंघोळ करून तयार होऊन निघायच्याच तयारीत असतांना मोबाइल वाजला. कोणी डीलर नी फोन केला असेल असं वाटून त्यांनी बघितलं पण अनोळखी नंबर होता. उचलावा की सोडून द्यावा  हा विचार करतच त्यानी फोन उचलला. एक मुलीचा आवाज ऐकू आला. “हॅलो कोण बोलतंय?” – मुलगी.   “मॅडम फोन तुम्ही केला, सॉरी. Wrong number” – विकास   “अहो थांबा.