दीपरामायण

  • 4.8k
  • 2k

आज 10/01/2023 ऑफिसमध्ये कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं त्याला कारण पण तसंच होतं. दीपीका … काल तुझ्याशी बोलल्यानंतर छान वाटलं पण  'वेड‘ पिक्चर बघितल्यानंतर मी तुला सांगितलं की त्या पूर्ण पिक्चर मध्ये मी तुलाच मेहसुस करत होतो, जिथे प्रेम शब्द येतो तिथे     दीपीका असणारच अशी माझी आता भावना झाली आहे. पण तुझा अभिप्राय विचारला तर तू म्हणालीस की मला तसं काही वाटलं नाही, मी पिक्चर बघताना आपल्या दोघांना कुठेच रिलेट करत नव्हते. मग मी विचार करू लागलो की चार दिवसापूर्वी हिनेच मला येऊन सांगितलं होतं की मी 'वेड' पिक्चर बघितला आहे तुम्ही पण बघा..! खूप छान आहे. तिने सांगितल्यामुळे