भेटली तू पुन्हा... - भाग 7

  • 11.6k
  • 6.8k

अन्वीच्या हाती त्या मुलीचा फोटो लागला. आदीला त्या फोटोबद्दल विचारले असता त्याने टाळाटाळ केली त्यामुळे ती अपसेट झाली. तिच्या आवाजावरून ती हर्ट झाल्याचे जाणवले पण का ते अजून ही त्याला समजत नव्हते. "ओके" तो तिचा हात सोडत बोलला. तशी ती मागे वळून न पाहतच तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आता पुढे... अन्वी जाताच आदिने दरवाजा बंद केला व पुन्हा डॉक्युमेंटस् पाहू लागला. पण आता त्याचे मन त्या कामात लागत नव्हते. त्याने डोळे चोळली व अन्वीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. मोबाईल अनलॉक करून त्याने कीपॅडवर एक नंबर डायल केला. सहा सात रिंग नंतर समोरून कॉल घेतला