रिमझिम धून - १५

  • 6.9k
  • 3.4k

'बाहेर पुन्हा गाडीचा हॉर्न वाजला होता. मंगेश बाहेर आला. हॉलमध्ये आल्यावर जुईने पहिले, फारुख भाई तिथे आले होते. अर्जुनचे दुसरे बॉडीगार्ड.'''अरे मॅडम आप, कैसे है? और यहा कैसे ?'' तो हात दाखवत म्हणाला. ''मॅडम डॉक्टर आहेत. पेशण्टच्या उपचारासाठी बोलावून घेतलं.'' मंगेश त्याला सांगत होता. ''आपसे मिलने के बाद साहब बी खोंये खोंये रहेते हैं, कुछ दवा दुवा दे दो.'' म्हणत फारुख भाई बॅग ठेवून खाली सोफ्यावर बसला. मंगेश हसायला लागला. जुईला काय बोलावं कळेना. ती गालातच स्माईल देऊन वरती पळाली.  ''फारुख सेठ क्या खबर हैं?''  एवढ्यात अर्जुन तिथे आला होता. त्याला बघून सगळे एकाएकी शांत झाले. आणि फारुख त्यांना केसच्या संबंधी