रिमझिम धून - १४

  • 6.4k
  • 3.2k

'जुई त्यांची चाललेली बडबड ऐकून घेत होती. शेवटी त्यांनी अर्जुनच्या खोलीत येऊन तिची बॅग आणि पर्स ठेवून दिली. ते पाहून जुईने त्यांना बाजूची खोली उघडायला सांगितली. तर त्या नाही म्हणाल्या.''साहेबानी तुमचं सामान इथे ठेवायला सांगितलं आहे. जर तुम्हाला बाजूची पाहिजे असेल तर साहेबांकडून चावी घ्या. मग मी ती खोली साफ करून देते.'' मावशी म्हणाल्या. आणि जुई 'ओके' बोलून अर्जुनच्या रूममध्ये शिरली. एव्हाना तो फ्रेश होवून कपडे चेंज करत होता. जुई सोफ्यावर बसून त्याच्याकडे बघत होती. शर्ट घालायला त्याने हात वरती केला आणि तो 'उफ' करून तसाच उभा राहिला.''अर्जुन स्वतःची जरा काळजी घेत जा. अजून तुझं ऑपरेशन पूर्णपणे बरं झालेलं नाहीये.