रिमझिम धून - १२

  • 5.1k
  • 2.8k

'लोणावळा सोडून पोलिसांची गाडी काही अंतरावर पुढे जाऊन थांबली. इथे अचानक गाडी थांबवण्याचे काहीही कारण नव्हते. त्याच्या मागे अर्जुन आणि मंगेश यांची गाडी पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर होती. ते गप्पा मारत होते, तेव्हाच त्यांना ओव्हरटेक करून एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर पुढे निघून गेली. ती अचानक त्या पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीच्या अगदी बाजूला चिकटून निघाली होती. थांबलेल्या पोलिसांच्या जीप मधून गोळीचा आवाज ऐकू आला. काहीतरी झटापटी सुरु झाली होती. अर्जुनला लक्षात आले आणि त्याने गाडीचा स्वीड वाढवला. गाडी चालवताना त्याने मोबाइल हातात घेऊन पुढे असलेल्या पोलीस गाडीचा फोटो काढून ठेवला होता. बाजूलाच असणाऱ्या काळ्या फॉर्चुनरचा फोटो सुद्धा त्या सोबत आला होता. पाहिजे असलेले