होल्ड अप - प्रकरण 23

  • 5.9k
  • 3.3k

होल्ड अप प्रकरण २३ मरुशिका चा जळफळाट झाला. “हो. ” ती नाईलाजाने म्हणाली. “ आता मी जे बोलणार आहे,त्यात अजिबात गोंधळ आणि चूक व्हायला नको आहे मला, समजुतीत.” पाणिनी म्हणाला. “ पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी चंदेरी सिगारेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल.बरोबर आहे?” पाणिनी ने विचारलं. “ पटवर्धन, तुम्ही एका विशिष्ट सिगरेट केस बद्दल बोलताय.” मरुशिका म्हणाली. “ मला वाटलंच होतं की तुम्ही आता अशी पलटी माराल म्हणून. तुम्हाला मी पुन्हा विचारतो, पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी कोणतीही सिगारेट केस होती, तर