होल्ड अप - प्रकरण 22

  • 6k
  • 3.3k

प्रकरण २२ “ ठीक आहे तर,शुक्रवारी मरुशिका मतकरी यांची उलट तपासणी चालू होती. त्यांना पुन्हा बोलवा ” न्या.एरंडे यांनी बेलिफ ला आज्ञा दिली.त्याने मरुशिका च्या नावाचा पुकारा दिला.मरुशिका सर्वांकडे पहात आणि न्यायाधीशांकडे स्मित हास्य करत पिंजऱ्यात आली. पाणिनी पटवर्धन उठून तिच्या दिशेने गेला. “ मागची साक्ष झाल्या नंतरच्या कालावधीत तुम्ही कामोद शी बोलणं केलंच असेल.” पाणिनी म्हणाला. “ नाही सर, मी नाही बोलले त्याच्याशी.कारण साक्षीदाराने आपली साक्ष इतर साक्षीदारांशी बोलणे अपेक्षित नसते.”-मरुशिका म्हणाली. “ पण आरुष काणेकरांबरोबर चर्चा केलीच असेल ना?” पाणिनी ने विचारलं. “ काही विशिष्ट मुद्द्यांवर बोललो आम्ही.” “ साक्ष देताना तू काय सांगणार आहेस याची चर्चा केलीस