होल्ड अप - प्रकरण 19

  • 5.6k
  • 3k

प्रकरण १९ “ अगदी थोडक्यात बचावलो ” पाणिनी म्हणाला. “ गौतम कडून पोलिसांना गेलेला फोन ? ” सौम्या “ हं, मॉडेल एजन्सी कडून आलेल्या त्या पत्रात नेमक्या कुठल्या नावाची मॉडेल एजन्सी होती ते लक्षात आहे? ” “ नाही आठवत. ऐश्वर्या मॉडेल एजन्सी असे नाव होत असं पुसटसं वाटतंय.” “ आपण जरा समोरच्या हॉटेलात जाऊन डिरेक्टरी चाळू आणि ऐश्वर्या मॉडेल एजन्सी सर्च करू. दरम्यान मी कनक ओजस ला फोन लावतो.” पाणिनी म्हणाला. ते दोघे हॉटेलात गेले.कनक फोन वर आला “ तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे पाणिनी. डाका पडलेल्या गाडीतून पळवली गेलेली पर्स मरुशिका ची नाही असं तुला वाटत होतं ना? ते