होल्ड अप - प्रकरण 18

  • 5.4k
  • 3.3k

प्रकरण १८सौम्या आणि पाणिनी पटवर्धन निवांत पणे एका हॉटेल मध्ये बसले होते. “ टोस्ट बटर आणि कडक कॉफी ”.पाणिनी ने वेटर ला सांगितलं.“ अजून डोक्यात गौतम चा विषय आहे?” पाणिनी च्या मनातले विचार जाणून सौम्या ने विचारलं.“ तो मला धोकादायक वाटतो सौम्या. म्हणजे नाटकी. विशेषतः स्वतःचे ठसे देताना तो जास्तच उत्साही वाटला मला.” पाणिनी म्हणाला आणि आपल्या विचारत हरवला.दरम्यान वेटर ने आणलेल्या टोस्ट आणि कॉफी चा त्या दोघांनी समाचार घेतला.“ काय सुचवायचं आहे तुम्हाला सर? ” –सौम्या.“ त्या घरातून त्याला जे काही हवं होतं, ते त्याने जाताना आपल्या बरोबर घेतलं हे नक्की.आणि ते सुध्दा अगदी आपल्या नाकावर टिच्चून, आपल्याला पत्ता