भेटली तू पुन्हा... - भाग 6

  • 11k
  • 7.4k

आदित्य दुपारी रूममध्ये परतला व काही तरी लिहू लागला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काम बाजूला ठेवून त्याने पटकन मोबाईल घेतला. साहिलचा कॉल होता."हॅलो! हा पोहचलास का?" आदि खुर्चीत आरामात बसत बोलला."हो आता जस्टच पोहचलो""ओके""तुझ्यामुळे आई मला घरात घेण्याआधीच ओरडत आहे"साहिल लटक्या रागाने बोलला."का? मी काय केले?" न समजून आदिने विचारले."तुला ये म्हणत होतो ना माझ्यासोबत " "हा मग""मग कायss मग, आई मला म्हणते पोराला एकट सोडून का आलास घेऊन ये म्हणले होते ना" तस आदी हसू लागला.साहिलचा आई साहिलच्या हातातील मोबाईल घेत बोलली."दे इकड मीच बोलते त्याच्याशी" "हॅलो!" एक प्रेमळ आवाज आदीच्या कानावर पडला."हॅलो! नमस्कार काकी, कश्या आहात?" आदि आदराने