महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग २

  • 4.2k
  • 2.2k

माझ्यासोबत आज कोणीही नव्हते. मी प्राध्यापकांच्या शेजारी असलेल्या ग्रंथालयात वाचन करत बसलो होतो. बाजूला तीन पुस्तके एकावर एक थप्पी मारून ठेवले होते. माझं वाचन सलग तीन तास सुरू होते. तीन लेक्चर आज वाया घालविले होते. ग्रंथालयात माझ्याशिवाय कोणीही नव्हते. मी एकटाच होतो. तसेही इतक्या सकाळी कोणी ग्रंथालयात फिरकत देखील नाही. समोर मॅडम बसले होते. ते पेपरात मग्न होते. चार मुले आत शिरली होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला असे वाटत नव्हते की ही मुले अभ्यास करण्याकरिता इथे आली असावे. माझ्यापासून ते पुष्कळ लांब बसले होते. नावाला पुढ्यात पुस्तक होते. त्यांच्या आपापसात बाता सुरू झाल्या. त्यांच्या बातांचा आणि माझा काही संबंध नव्हता